1/ #thread… by @Pratik__Khopade

1/ #thread झेप छोटीशी सुरुवात पुढे कुठे नेईल याचा काही नेम नाही ! आज अशीच एक सुरुवात करतोय …. माणसाचे आयुष्य असंख्य त्रासांनी वेढले आहे . मनुष्य प्राणी भूतलावरील सर्वात बुद्धिमान आहे खरा परंतु सर्वश्रेष्ठ नाही !

2/ जन्माला आल्यावर सटवाई त्याच्या माथी त्याचे नशिब लिहून जाते असे म्हणतात पण खरं पाहायला गेलं तर माणूस स्वतःच स्वतःचं नशिब बनवू पाहतो . काळ बदलला आहे . प्रत्येकाला आयुष्याच्या या शर्यतीत जिंकायचाय आणि त्यातून च सुरू होतो तो संघर्ष!!! काही असतात नशिबवान !

3/ असं म्हणतात ते जणू काही सोन्याचा चमचा च तोंडात घेऊन जन्मलेत . आता याला मागच्या जन्मीचीं पुण्याई म्हणा किंवा नशिब . सारा समाज विभागला गेला आहे . कुणी कर्माने मोठा तर कुणी पैशाने . आजकाल बहुतेक ठिकाणी पैसा बोलतो . श्रीमंत अधिक श्रीमंत होतायेत आणि गरीब आणखी गरीब !

4/ हा मुद्दा राजकीय विषयाला फाटे फोडत असला तरीही सत्य मानावा लागेल . आयुष्य माणसाला कुठे नेईल याचा काही अंदाज नाही . अगदी ज्योतिष शास्त्र देखील इत्यंभूत भविष्य सांगू शकत नाही की उद्याचा दिवस तुमच्या साठी काय नवीन आव्हाने घेऊन उगवणार आहे .

5/ मराठीत एक म्हण आहे – “राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही!” आज एखाद्याची परिस्थिती नसेलही परंतु ती उद्या काय असेल याचा अंदाज लावणे हवामानाचा अंदाज लावण्या इतपत सोपे नाही . एकदा का पक्षाच्या पंखांत बळ आलं की त्याला भरारी मारण्यापासून कोणीही रोखू शकत नाही !

6/ अगदी असेच आपण आपल्या परिस्थिती वर मात करू शकतो. पण ते बळ येण्यासाठी आधी आपण प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. दिवस बदलत राहतात . वाईट दिवसही रात्रीच्या काळोखा सारखे आयुष्यात थोडा च वेळ असतात पण त्या काळोखात जर माणूस हरवला तर पुन्हा सापडणे कठीण च !

7/ पण जो उद्याच्या सूर्याची वाट पाहतोय त्याचे आयुष्य नक्कीच उजळून जाणार आहे . सगळेच दिवस चांगले असले तर त्या जगण्याला अर्थ तरी काय उरला! ते म्हणतात ना वाईट दिवस पाहिल्याशिवाय चांगले दिवस दिसत नाही तेच खरे ! आपल्याला पूर्ण माहिती नसताना आपण इतरांविषयी आपले मत मांडून मोकळे होतो.

8/ या मायावी जगात माणुसकी खूप कमी उरली आहे आता … सर्व गोष्टी पैशाने मोजल्या जातात , फक्त वस्तू काय माणसे सुद्धा! माणसात प्रचंड दुर्गुण आहेत . त्यातील एक म्हणजे आपल्यापेक्षा कमी असलेल्याला पाण्यात पाहणे ! पण तोच एक दिवस कधी आपल्या पुढे निघून जाईल हे कळणार देखील नाही .

9/ गोष्टी सहजा सहजी मिळाल्या की त्याची किंमत राहत नाही . आज चित्र उलटे आहे . सर्व काही एका शब्दाच्या दुरीवर आहे . हट्ट पुरवावेत पण त्याचा अतिरेक झाला की संपलं !

10/ आयुष्य सुंदर च आहे त्याला तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा हवी आहे आणि मग बघा उमललेल्या कळी प्रमाणे तुमचे आयुष्य कसे खुलते! ~कतिप्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *